केरळमधील कन्नूर भागात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची हत्या केल्याचा आरोप आह़े  या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी केरळमधील संघ स्वयंसेवक आणि भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली़  मात्र काही ठिकाणी त्याला हिंसाचाराचे गालबोट लागल़े  दरम्यान, येथील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रन्टच्या शासनाने या हत्येच्या सविस्तर चौकशीचे आदेश गुन्हे शाखेला दिले आहेत़  
तसेच आठ संशयितांना ताब्यातही घेण्यात आले आह़े  हत्येच्या घटनेची केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गंभीर दखल घेतली आह़े  केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून घटनेची माहिती घेतली़  
तसेच गुन्हेगारांना पकडण्यासाठी राज्य शासनाने काय पावले उचलली याबद्दलही विचारणा केली़ दरम्यान, हत्येच्या निषेधार्थ राज्यभर झालेल्या निदर्शनांमध्ये गावठी बॉम्बचा वापर करण्यात आला, तर अनेक ठिकाणी दगडफेकीच्याही घटना घडल्या़  त्यामुळे येथील जनजीवन काही काळ विस्कळीत झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.