आसामचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नेते अंजन दत्ता यांची सोमवारी सीबीआयने शारदा चीटफंड घोटाळाप्रकरणी चौकशी केली. दत्ता यांना चौकशीसाठी कोलकातामधील सीजीओ संकुलात पाचारण करण्यात आले होते. दत्ता हे आसाममधील अमगुरी मतदारसंघातील आमदार असून २८ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानची सीबीआयने झडती घेतली होती. दत्ता हे आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे निकटवर्तीय मानले जातात.शारदा समूहाबाबतची माहिती प्रकाशित करण्यात दत्ता यांनी विशेष रस घेतल्याने त्यांचे या समूहाशी कशा प्रकारचे संबंध आहेत त्याची चौकशी करण्यात आली. दरम्यान, या मुद्दय़ावरून पश्चिम बंगालमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.