यूपीए-२च्या राजवटीत गाजलेल्या कोळसा खाणवाटप घोटाळ्यानंतर आता पुन्हा एकदा खाणींच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच लिलावात उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स सिमेंट कंपनीला ७८९ कोटी रुपयांचे कंत्राट मिळाले आहे.
खाणींचा लिलाव ई-निविदा प्रक्रियेद्वारे सुरू करण्यात आला असून त्यामध्ये रिलायन्स सिमेंटने हिंदुस्थान झिंक लि. आणि ओसीएल आयर्न अ‍ॅण्ड स्टील या कंपन्यांवर बाजी मारली आहे. रिलायन्सला  छिंदवाडा जिल्ह्य़ातील सिअल घोघरी येथील कोळशाची खाण मिळाली आहे.