कोब्रा सापाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजत आहे. या व्हिडिओमध्ये ८ ते ९ फूट लांबीचा कोब्रा साप नजरेस पडतो. एक व्यक्ती कोब्रा सापाबरोबर थरारक कारनामे सादर करत असताना अचानक हा साप प्रेक्षकांमध्ये घुसतो. कोब्राच्या हल्ल्यातून प्रेक्षक थोडक्यात वाचतात. सादरकर्ता कोब्रा सापाला एका पेटीतून बाहेर काढून रिंगणाच्या मधोमध आणतो आणि कोब्रासोबतचे आपले थरारक कारनामे करण्यास सुरुवात करतो. रिंगणाच्या अवतिभवती बसलेले प्रेक्षक हा धाडसी प्रकार आपल्या डोळ्यात सामावून घेत असतात. सादरकर्ता सापाला डिवचून त्याच्या तोंडाचे चुंबन घेतो. हे पाहून प्रेक्षक अचंबित होतात. यानंतर सादरकर्ता कोब्राची शेपटी पकडून त्याला प्रेक्षकांजवळ घेऊन जातो. दरम्यान कोब्रा त्याच्या हातातून निसटून प्रेक्षकांमध्ये घुसतो. यामुळे प्रेक्षकांमध्ये एकच गोंधळ उडतो. सादरकर्ता क्षणाचाही विलंब न लावता सापाला परत रिंगणात आणतो. त्याच्या प्रसंगावधनामुळे पुढील दुर्घटना टळते. शेवटी सापाला पेटीमध्ये बंद करून ठेवण्यात येते.

व्हिडिओ