केंद्रीय मंत्री सलमान खुर्शीद यांच्याविरुद्ध आपल्या फारुकाबाद मतदारसंघात आचार संहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
फारुकाबादामध्ये सौर दिवे आणि इतर काही वस्तूंनी भरगच्च भरलेले वाहन पोलिसांनी अडविले या वस्तूंचे निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर गावकऱयांना वाटप करण्यात येणार होते.
कुंपाल पोलीस ठाण्याचे अधिक्षक के.व्ही.सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, सौर दिवे आणि इतर काही वस्तूंनी भरलेले वाहन बहुरा गावात अडविण्यात आले. या वस्तू मते झोळीत पाडण्याच्या उद्देशाने गावकऱयांना वाटण्यात येणार होत्या. वाहनचालकाची चौकशी केल्यानंतर या वस्तू सदर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सलमान खुर्शीद यांच्याकडून पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानुसार खुर्शीद यांच्याविरोधात आचार संहितेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.