पटेल समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे तीव्र पडसाद गुरुवारी गुजरात विधानसभेत उमटले. या प्रश्नावरून सभागृहात गोंधळ झाल्याने विरोधी पक्षनेते शंकरसिंह वाघेला वगळता काँग्रेसच्या अन्य सर्व आमदारांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले. राज्य सरकारने सदर आंदोलन चुकीच्या पद्धतीने हाताळले अशा आशयाच्या घोषणा काँग्रेसच्या आमदारांनी सभागृहात केल्या त्यामुळे विधानसभा अध्यक्ष गणपत वसावा यांनी त्यांना निलंबित केले.