लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाणाऱ्या काँग्रेसला आता लोकसभेत मागच्या बाकावरच बसावे लागणार आहेत. संसदीय नियमांनुसार काँग्रेसच्या खात्यात एकूण सदस्यसंख्येच्या एक दशांश सदस्यसंख्या नसल्याने काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करता येणार नसल्याचा निर्वाळा अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी शुक्रवारी दिला. विरोधी पक्षनेतेपदावरून निर्माण झालेल्या गुंत्यामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी रोहतगी यांच्याकडे सल्ला मागितला होता. राजीव गांधी यांच्या काळात काँग्रेसला ४०० जागा मिळाल्या असताना त्यावेळी तेलुगु देसमला विरोधी पक्षनेतेपद नाकारताना हाच नियम लावण्यात आला होता.