दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांनी राहुल गांधी अजून मॅच्युअर (परिपक्व) झालेले नाहीत. त्यांना आणखी वेळ दिला पाहिजे, असे म्हटले आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपले मत व्यक्त केले. राहुल गांधीविषयी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आम्ही आता संक्रमण प्रक्रियेतून जात आहोत. पिढीतील बदलाबरोबरच गेल्या काही वर्षांपासून राजकारणही बदलले आहे. राजकारणातील भाषाही खूप बदलली आहे. माजी पंतप्रधानांबाबत मोदींनी जे शब्द वापरले ते एका पंतप्रधानांकडून अपेक्षित नाही, असे ते म्हणाले. या वातावरणात काँग्रेसला स्वत:ला तपासून पाहत आहे. तुम्ही लक्षात ठेवा राहुल गांधी अजून परिपक्व झालेले नाहीत. त्यांचं वय अजून परिपक्व होण्यालायक नाही. कृपया त्यांना वेळ द्या. राहुल हे एकमेव नेते आहेत, ज्यांनी शेतकऱ्यांच्या हिताबाबत बोलले आहे.
राहुल गांधी यांना आणखी किती वेळ हवा, हा प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, त्यांनी अनेक गोष्टी अवगत केल्या आहेत. अजून अनुकूल स्थिती न आल्याने ते पंतप्रधान बनलेले नाहीत. परंतु ते खूप मेहनत घेत आहेत. ते लोकांना भेटतात. एखाद्यासमोर आपलं म्हणणं कसं मांडायचं हे त्यांना चांगलंच माहीत आहे.
सपबरोबरील युतीसाठी प्रचार करत नसल्याच्या प्रश्नावर दीक्षित म्हणाल्या, मी प्रचार करत नसल्याचे म्हणणे चुकीचे आहे. पक्षाने मला जे-जे काम दिलं आहे. ती सर्व कामे मी केली आहेत. मला कानपूर आणि वाराणसीला जायचं होतं. पण माझी प्रकृती ठीक नसल्याने जाऊ शकले नाही. आता मी ठीक आहे. लवकरच वाराणसीला मी जाईन, असे त्यांनी सांगितले.
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाबरोबर युती होण्यापूर्वी शीला दीक्षित या काँग्रेसच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार होत्या. परंतु युती होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर त्यांनी अखिलेश यादव यांच्या नेतृतवाखाली काम करण्यास तयार असल्याचे सांगत आपली उमेदवारी मागे घेतली होती.