केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व जहाजबांधणी खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्याला काँग्रेसने सोमवारी लक्ष्य केले. सामान्य नागरिक अडीच लाख रुपयांसाठी मरायला लागला असताना भाजपचे नेते पंचतारांकित विवाहसोहळ्यांवर करोडो रुपये खर्च करीत असल्याची टीका काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी केली.

‘गडकरींच्या मुलीला विवाहानिमित्त आमच्या शुभेच्छाच आहेत; पण या विवाहासाठी कोटय़वधी रुपये खर्च केल्याची आमची माहिती आहे. यावेळी गोगोईंनी कर्नाटकातील भाजप नेते व खाणसम्राट जनार्दन रेड्डी यांच्या कुटुंबातील शाही विवाहावरही टीका केली.

गडकरींची कन्या केतकी हिचा विवाह रविवारी नागपुरात पार पडला. ८ नोव्हेंबर आणि १५ नोव्हेंबरला दिल्लीमध्ये स्वागतसोहळा आयोजित केला आहे.