काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला आरक्षण विधेयकाबाबत एक पत्र लिहिले आहे. लोकसभेत भाजप सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे रखडलेले महिला आरक्षण विधेयक मंजूर करता येऊ शकते, असे त्यात म्हटले आहे. या विधेयकात महिलांना संसद आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षणाची तरतूद आहे.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात म्हणजेच २०१० मध्ये हे विधेयक राज्यसभेत मंजूर झाले होते. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सरकारने मोठे पाऊल टाकले आहे, असे त्यावेळी सांगण्यात येत होते. हा सोनिया गांधीचा विजय असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात होते. पण मनमोहन सिंग सरकारला हे विधेयक लोकसभेत मंजूर करून घेता आले नाही. त्यावेळी समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेसने या विधेयकाला जोरदार विरोध केला होता. काँग्रेसचे काही खासदारांचाही या विधेयकाला विरोध होता. तेव्हापासून रखडलेले हे विधेयक लोकसभेत मंजूर करून घ्यावे, असे आवाहन गांधी यांनी मोदींना पत्राद्वारे केले आहे. भाजपचे सरकारचे लोकसभेत बहुमत आहे. त्यामुळे हे विधेयक मंजूर करून घेण्यात यावे. महिला सबलीकरणासाठी या विधेयकाला काँग्रेस पक्ष पाठिंबा देईल, असे सोनिया यांनी पत्रात म्हटले आहे.

सोनिया गांधींनी पत्रात काय म्हटले आहे? वाचा.

Dear Prime Minister,

You may recall that the Rajya Sabha had passed the Women’s Reservation Bill on March 9, 2010. Since then, however, it has languished in the Lok Sabha for one reason or another.

I am writing to request you to take advantage of your majority in the Lok Sabha to now get the Women’s Reservation Bill passed in the Lower House as well. The Congress Party has always and will continue to support this legislation which will be a significant step forward in the empowerment of women. You may recall that it was, in fact, the Congress Party and its late leader Shri Rajiv Gandhi who first mooted the provision for reservation for women in panchayats and nagarpalikas in the Constitution Amendment Bills which the Opposition parties thwarted in the Rajya Sabha in 1989 but later were passed by both Houses of Parliament in 1993 becoming the 73rd and 74th Amendments.

With Regards,

Yours sincerely,

Sonia Gandhi