इंडियन मुजाहिद्दीन संघटनेचा संशयित दहशतवादी एजाज शेख याला दिल्ली न्यायालयाने २० दिवसांची पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले. बेकायदा शस्त्र कारखाना उभारल्याच्या आरोपात शेख याला अटक करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रितेश सिंह यांच्यासमोर शेख याला मंगळवारी हजर करण्यात आले. या प्रकरणी तपास सुरू असून शेख याला आणखी २० दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने न्यायालयाकडे केली. शेख याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाइलमधील सीम कार्ड आणि कॉल्सची माहिती मिळविण्यात येत आहे.