तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरुद्धचा फौजदारी खटला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आह़े  २००१च्या निवडणुकांसाठी एकाच वेळी चार मतदारसंघांतून उमेदवारी अर्ज भरल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने जयललिता यांच्याविरुद्ध खटला भरण्याचे आदेश दिले होत़े . या आदेशाचा पुनर्विचार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाला दिले आहेत़
आदेश देण्यापूर्वी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे दोन अहवाल उच्च न्यायालयाकडून ग्राह्य धरण्यात न आल्याचा आरोप होत असल्याने उच्च न्या़  एच़ एल़ दत्तू आणि सी़ के. प्रसाद यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाला आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचे आदेश दिल़े  मद्रास उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध जयललिता यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हा निर्णय देण्यात आला़