मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
'सीआरपीएफ'च्या जवानाने सहकाऱ्यांवर केलेल्या गोळीबारात चार जवान ठार झाले असून एक जखमी झाला आहे. छत्तीसगढमधील दंतेवाडा जिल्ह्यातील 'सीआरपीएफ'च्या दीप कुमार तिवारी या जवानाने काल (सोमवार) रात्रीच्या सुमारास त्याचे सहकारी विश्रांती घेत असताना तिवारीने त्यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती दंतेवाड़ाचे पोलिस अधीक्षक नरेन्द्र खरे यांनी दिली. १११ सीआरपीएफ बटालियन चे जवान दीप कुमार तिवारी यांनी आपल्या झोपलेल्या सहका-यांवर गोळ्या झाडण्यास सुरूवात केली. या गोळीबारात तीन जवान जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी जवानावर जगदलपूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तिवारी यांनी अचानक केलेल्या गोळीबारामागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून तिवारीला मानसिक समस्या असल्याचे सांगितले जात आहे.




















लष्कर,सीआरपीएफ ह्याठिकाणी काम करणाऱ्या जवानांमध्ये वरील प्रवृत्ती वारंवार आढळून येते आहे जी चिंताजनक आहे. संबंधित खात्यांनी अशा जवानांचे नीट समुपदेशन करणे गरजेचे आहे ज्यामुळे त्यांच्यावरील मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल व असे गोळीबारासारखे प्रकार टाळता येतील.