चर्च, संघाच्या ठिकाणांवर हल्ल्याचा कट
गुजरातेत चर्च व रा.स्व.संघाच्या ठिकाणांना तसेच पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करून जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केल्याच्या आरोपावरून दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीच्या दहा जणांविरोधात अहमदाबाद न्यायालयात राष्ट्रीय तपास संस्थेने म्हणजे एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने केलेल्या चौकशीत असे दिसून आले, की २०१५ मध्ये गुजरातमध्ये भडोच येथे िहदू संघटनांच्या व्यक्तींना ठार मारण्याचा कट आखण्यात आला होता. भडोच जिल्ह्य़ाचे माजी भाजप प्रदेशाध्यक्ष शिरीष बंगाली व पक्षाच्या युवक शाखेचे सरचिटणीस प्रग्नेश मिस्त्राी यांना मोटरसायकलवरून आलेल्या दोन जणांनी २ नोव्हेंबर रोजी ठार केले होते. यात दहापकी सात आरोपींना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील गुन्हेगार याकुब मेमन याच्या फाशीचा बदल घेण्यासाठी हे कृत्य करण्यात आले होते व दहा पकी सात जणांना अटक करण्यात आली होती. याकूबचा भाऊ टायगर मेमन, दाऊद व अनीस इब्राहिम यांनी मुंबईत बॉम्बस्फोटाचा कट आखला होता व त्यात अडीचशे लोक मारले गेले होते. आरोपपत्र दाखल केलेल्यात दक्षिण आफ्रिकेचा झाहिदमिया, पाकिस्तानचा जावीद पटेल ऊर्फ जावेद चिकना यांचा समावेश आहे. हे सगळे दाऊद टोळीचे असून त्यांच्यावर गुजरातेत चर्चवर हल्ल्याचा आरोप आहे. गुजरात येथील काही लोकांना पसे, धर्म व नोकऱ्यांची आमिषे दाखवून हल्ले करण्यास सांगण्यात आले होते. जावेद चिकना व झाहिदमिया यांचा कट पूर्ण करण्याचे काम त्यांना दिले होते, असे एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आरोपपत्रात म्हटले आहे, की चिकना हा दुबईहून गुजरातला हवाला मार्गाने पसा पाठवत होता व बांगली व मिस्त्री यांना ठार मारपण्यासाठी शस्त्रेही पाठवण्यात आली होती.