गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी आपल्या मित्रासोबत प्रवास करणाऱ्या २३ वर्षीय तरुणीवर चालत्या बसमध्ये सहा जणांनी अमानुषपणे अत्याचार केला होता. या प्रकरणी न्यायालयातर्फे मृत तरुणीच्या मित्राची आज चौकशी करण्यात आली. या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला सुरू असून २ फेब्रुवारी रोजी या गुन्ह्य़ातील पाच आरोपींविरोधात अपहरण, बलात्कार, खून, दरोडा आदी गुन्ह्य़ांसाठी आरोपपत्र दाखल केले आहे.
मंगळवारी पीड़ित तरूणीच्या मित्राची, जो व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजीनियर आहे, त्याने आपली साक्ष दिली आणि पाच आरोपींची ओळख पटवली. त्याचबरोबर त्याने त्या बसचीसुध्दा ओळख पटवली, ज्यामध्ये सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. त्यासाठी बसला कोर्टाच्या परिसरात आणण्यात आले होते.
पीड़ित तरूणीचा मित्र या प्रकरणात एकमेव प्रत्यक्ष साक्षीदार आहे. तरूणीसोबत सामूहिक बलात्कारापूर्वी या तरूणाला मारहाण करण्यात आली होती, त्यामुळे आजवर त्याला चालता-फिरता येत नाहिए. सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेला पीडित मृत तरुणीचा हा २८ वर्षीय मित्र व्हील चेअरवरून मंगळवारी न्यायालयात हजर झाला. या प्रकरणाची रोज सुनावणी होणार आहे आणि सर्व आरोपींना रोज न्यायालयात सादर केले जाणार आहे.