दिल्ली महिला आयोगाच्या प्रमुखपदी स्वाती मालीवाल यांची करण्यात आलेली नियुक्ती बुधवारी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी फेटाळून लावली आहे.
स्वाती मालीवाल (वय ३०) मुख्यमंत्र्यांच्या तक्रार सल्लागार असून त्यांना अलीकडेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची नेमणूक केली होती. लेफ्टनंट जनरल नजीब जंग यांनी या नेमणुकीस परवानगी घेण्यात आलेली नाही असा मुद्दा पुढे करून नियुक्ती फेटाळून लावली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नायब राज्यपालांनी त्यांच्या नेमणुकीच्या प्रक्रियेस आक्षेप घेतला असून राज्य महिला आयोग प्रमुखांच्या नेमणुकीची फाईल मंजुरीसाठी का पाठवली नाही अशी विचारणा केली आहे. प्रत्येक नेमणूक ही घटनात्मक असून केजरीवाल यांना ते माहीत आहे. त्यांना कामात रस नसून फक्त बरखा शुक्ला व स्वाती मालीवाल यांच्यात भांडणे लावण्यात रस आहे.