दिल्लीत पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ल्युटन्स झोनमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडला. या महिलेने पोलिसांना ईमेलद्वारे केलेल्या तक्रारीत, तिचा गाईड आणि अन्य चारजणांनी आपल्यावर सामूहिक बलात्कार केल्याचे म्हटले आहे. एप्रिल महिन्यात हा प्रकार घडला होता. त्यानंतर या अमेरिकन महिलेने एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने कॅनोट प्लेस येथील पोलीस ठाण्यात यासंबंधीची तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यापूर्वी पोलिसांकडून घटनेची प्राथमिक चौकशी केला जात आहे. पीडित अमेरिकन महिलेने तक्रारीत म्हटल्याप्रमाणे, ती एप्रिल महिन्यात भारतामध्ये आली होती. त्यावेळी ती एका पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्याला होती. दरम्यान, दिल्लीत फिरण्याच्यानिमित्ताने तिची एका गाईडशी ओळख झाली. त्याने या महिलेला अनेक पर्यटनस्थळांवर नेले होते. यादरम्यान, दोघांची चांगली मैत्रीही झाली. त्यानंतर हा गाईड महिलेच्या हॉटेलमधील खोलीवर अनेकदा आला होता.

एके दिवशी तो आपल्या आणखी मित्रांसह हॉटेलमधील खोलीवर आला होता. त्यावेळी त्यांनी मला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. मी शुद्धीवर आले तेव्हा माझ्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे लक्षात आले. मी या प्रकाराची वाच्यता केली तर भयानक परिणाम होतील, अशी धमकीही मला देण्यात आली होती, असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. मी घाबरल्यामुळे पोलिसांकडे गेले नाही. मात्र, माझ्या घरी परतल्यानंतर मी पालकांना हा प्रकार सांगितला. त्यावेळी त्यांनी मला या सगळ्याची तक्रार दाखल करण्यास सांगितले. मला न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींना कडक शासन झाले पाहिजे, अशी मागणी या महिलेने केली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष दल तैनात केले असून ते गाईड आणि त्याच्या मित्रांचा शोध घेत आहेत.

Baramati Namo Maharojgar Melava
निमंत्रण पत्रिकेतील आणखी एक घोळ सुधारण्यासाठी प्रशासनाची धावाधाव
Case against Sudhakar Badgujar
सुधाकर बडगुजर यांच्याविरोधात गुन्हा, सलीम कुत्ता पार्टी प्रकरण
Yash Mittal Murder Noida
व्यावसायिकाच्या मुलाची चार मित्रांकडून हत्या; वडिलांकडून मागितली सहा कोटींची खंडणी
Gutkha smuggler Israr Mansoori in police custody nashik
गुटखा तस्कर इसरार मन्सुरी यास पोलीस कोठडी