म्हशींची ट्रकमधून वाहतूक करणाऱ्या तिघांना एका प्राणी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना दक्षिण दिल्लीत घडली आहे. रिझवान, कामिल, आशू अशी मारहाण झालेल्या तिघांची नावे आहेत. मारहाणीत जखमी झाल्याने त्यांना एम्समधील ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी परस्परांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दूरध्वनीवरून या घटनेची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर तीन तरुणांना मारहाण केल्याचे पाहिले. मारहाणीत तिघेही जखमी झाले होते. त्यांना एम्सच्या ट्रामा सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. तसेच म्हशींसह ट्रक ताब्यात घेण्यात आला. या प्रकरणी पीपल्स फॉर अॅनिमल (पीएफए) या एनजीओतर्फे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या एनजीओचे काही कार्यकर्तेही घटनास्थळी उपस्थित होते. मात्र, जनावरांची वाहतूक करणाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप त्यांनी फेटाळला आहे, असे पोलिसांनी सांगितले. एनजीओच्या माहितीनुसार, ट्रकमधून जनावरांची बेकायदेशीरपणे वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाला. ट्रकमध्ये म्हशींना कोंबले होते. काही म्हशींचा मृत्यूही झाला होता. म्हशींची अवस्था पाहून स्थानिक भडकले. त्यांनी ट्रकचालकासह तिघांना बेदम मारहाण केली. दुसरीकडे तिघांनी मारहाण करणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तर एनजीओनेही या तिघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. दिल्ली-एनसीआर या परिसरात दररोज हजारो जनावरांनी बेकायदेशीरपणे वाहतूक केली जाते. शनिवारी सकाळी दक्षिण दिल्ली परिसरात पोलिसांनी अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारे नऊ ट्रक पकडले आहेत, अशी माहितीही एनजीओने दिली आहे.

pune ola uber marathi news
ओला, उबरचे काय होणार? जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात लवादाकडे धाव
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश
Politics, ED, CBI Probe and BJP
भ्रष्टाचार विरोधी कारवाई सुरू झालेले २५ नेते भाजपात, २३ जणांना थेट दिलासा!
Police action against 142 drunken drivers in Dhulwadi pune news
धुळवडीला १४२ मद्यपी वाहनचालक पोलिसांच्या जाळ्यात; नियमभंग करणाऱ्या साडेअकराशे वाहनचालकांवर कारवाई