आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये तरूण मतदारांनी सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठीची जनजागृती करण्याच्या दृष्टीने दिल्ली निवडणूक आयोगाने अभिनेत्री सोह अली खान, क्रिकेटपटू विराट कोहली आणि ‘बालिका वधू’ मालिकेतील अभिनेत्री तोरल रासगुप्ता यांची ब्रॅण्ड अँम्बॅसिडर म्हणून निवड केली आहे.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘में है दिल्ली, वोट करेंगे’ या विषयसूत्राचे अनावरणही यावेळी करण्यात आले. दिल्ली विधानसभेची निवडणूक ४ डिसेंबर रोजी होत आहे. यावेळी सोहा अली खान म्हणाली, मतदानाला आपण गृहीत मानू नये, मी सर्वांना आणि विशेषत तरुणाईला आवाहन करते की, निवडणुकीदिवशी मतदान जरुर करा’