दिल्लीमध्ये २० वर्षीय विद्यार्थ्यीनीवर पाच जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्यामुळे दिल्लीमध्ये खळबळ उडाली आहे. त्यापैकी काही जण हे तिच्या वर्गात शिकणारेच विद्यार्थी होते. तिच्यावर ३ फेब्रुवारी रोजी बलात्कार करण्यात आला. आरोपींच्या भीतीमुळे ही बाब तिने कुणालाच सांगितली नाही. त्यानंतर ते तिला त्रास देऊ लागले त्यानंतर तिने तक्रार दिली. पोलिसांनी त्वरित कारवाई करत चार जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण पळून गेला आहे. तर एक जणाने त्यांना या गुन्ह्यात सहाय्य केले त्याला देखील अटक करण्यात आली आहे.

नोएडामध्ये शिकणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थीनीच्या कॉलेजमध्ये स्नेह संमेलन होते. स्नेह संमेलन संपल्यानंतर तिच्या वर्गमित्राने तिला आपल्या घरी येण्यास विचारले. आपल्या घरी छोटी पार्टी आहे तिथे अनेक मुली देखील आहेत असे त्याने सांगितले. त्याने तिला आपल्या दुचाकीवर बसवले, त्याच्या सोबत आणखी एक वर्गमित्र आला. ते तिघे मिळून एका फरिदाबाद येथील एका फ्लॅटवर गेले. तिथे इतर तिघे जण आले. त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांनी म्हटले. बलात्कार झाल्यानंतर तिला धमकवण्यात आले. या घटनेनंतर तिला तिच्या फ्लॅटवर सोडण्यात आले.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
arvind kjriwal jail tihar
अरविंद केजरीवाल करणार वर्क फ्रॉम जेल? काय आहेत कायदेशीर तरतुदी?
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

तेव्हा जाताना देखील एका निर्जन ठिकाणी आरोपीने बलात्कार केल्याचे पोलिसांनी म्हटले. या घटनेनंतर तिला वारंवार धमक्या येऊ लागल्या होत्या आणि तिची छळवणूक केली जात होती.  मुख्य आरोपीने तिच्या फ्लॅटवर जाऊन परत एकदा बलात्कार केल्याचेही तक्रारीमध्ये म्हटले आहे. या छळवणुकीला कंटाळून तिने कॉलेजच्या लैंगिक छळ प्रतिबंधक समितीकडे तक्रार केली. त्या समितीने पोलिसांकडे तक्रार केली आहे. भारतीय दंडविधान ३७६ ड आणि १२० ब नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर पोलिसांच्या असे लक्षात आले की या गुन्ह्यामध्ये आणखी एका व्यक्तीने साहाय्य केले आहे.

त्या ही व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. डिसेंबर २०१२ मध्ये २३ वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार झाल्यानंतर दिल्लीमध्ये खळबळ उडाली होती. या बलात्कारादरम्यान तिला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे तिचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर शाळा आणि कॉलेजमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधक समिती असावी अशी एक सूचना करण्यात आली होती. त्यानुसार कॉलेजमध्ये समित्यांची स्थापना करण्यात आली. त्या समितीकडे दिलेल्या तक्रारीमुळेच पुढील कारवाई झाली.