दिल्लीत दारुच्या नशेत एका पोलीस कॉन्स्टेबलनं दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसमोरच अश्लिल चाळे केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मद्यधुंद कॉन्स्टेबलनं महिला सहकाऱ्यासमोरच हस्तमैथून केलं. तसंच इतर दोन महिला सहकाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यानंतर संबंधितावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Exclusive Video : धक्कादायक! CST स्थानकात एक्स्प्रेसमध्येच तरुणीसमोर तरूणाचे अश्लिल चाळे

दिल्ली पोलीस प्रशिक्षण शिबिरातील ही घटना आहे. काल संध्याकाळी सहाच्या सुमारास या महिला कर्मचारी कॅन्टीनमध्ये नाश्ता करत होत्या. तिथे ३१ वर्षीय कॉन्स्टेबलही आला. तो मद्यधुंद अवस्थेत होता. एका सहकारी महिलेच्या जवळ बसून तो अश्लिल चाळे करत होता. महिला कर्मचाऱ्यांनी त्याला हटकले. त्यावेळी त्यानं त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठांकडे तक्रार करू, असं त्यांनी कॉन्स्टेबलला बजावलं. त्यावर त्यानं महिला पोलिसांची माफी मागितली आणि तेथून निघून गेला. त्यानंतर तो छतावर गेला. त्यानं दुसऱ्या एका महिला कॉन्स्टेबलसमोर हस्तमैथून करण्यास सुरुवात केली. याबाबत महिला पोलिसांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. वरिष्ठांनी या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि संबंधित कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याची विभागीय चौकशी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलं.