गेल्या वर्षी कथित द्वेषपूर्ण भाषण दिल्याबद्दल ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमिन (एआयएमआयएम)चे नेते व खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती दिल्लीतील न्यायालयाला देण्यात आली.
महानगर दंडाधिकारी मुनीश गर्ग यांच्या आदेशानुसार पोलिसांनी न्यायालयात पूर्तता अहवाल सादर केला.
वेगवेगळ्या गटांमध्ये शत्रुत्व फैलवणे, शांतताभंग करण्याच्या उद्देशाने अवमान करणे, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे व फौजदारी कट रचणे यासह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलमांखाली ओवैसी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.