इंटरनेटवर कधी कोणता व्हिडिओ धुमाकूळ घालेल, हे सांगता येणे अतिशय अवघड आहे. त्यामुळेच ढिंच्याक पूजाचे सुमार दर्जाचे म्युझिक व्हिडिओदेखील सध्या लोकांनी डोक्यावर घेतले आहेत. सोशल मीडियावर ढिंच्याक पूजाची सध्या जोरदार चर्चा आहे. दिल्लीच्या पोलिसांनीदेखील नुकताच ढिंच्याक पूजाचे नवे गाणे पाहिले आहे. मात्र पोलिसांनी हे गाणे ढिंच्याक पूजाचे फॅनचे फॅन म्हणून पाहिलेले नाहीत. तर ढिंच्याक पूजावर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी व्हिडिओ पाहिला आहे. त्यामुळे लवकरच पोलीस ढिंच्याक पूजावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वीच ढिंच्याक पूजाचे ‘दिलों का शूटर, है मेरा स्कूटर’, हे गाणे युट्यूबवर आले. या गाण्याची सध्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर आहे. आपल्या नेहमीच्या ‘शैलीत’ ढिंच्याक पूजाने हे गाणे गायले आहे. ‘खास लोकाग्रहास्तव’ आपण व्हिडिओ रिलीज करत असल्याचे ढिंच्याक पूजा कायम सांगते. त्यामुळेच काही दिवसांपूर्वी ढिंच्याक पूजाने ‘दिलों का शूटर, है मेरा स्कूटर’, हे नवे गाणे रिलीज केले. या गाण्याच्या व्हिडिओमध्ये ढिंच्याक पूजाने हेल्मेट घातलेले नाही. त्यामुळेच दिल्ली पोलिसांकडून तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.

एका व्यक्तीने दिल्ली पोलिसांकडे ढिंच्याक पूजाने व्हिडिओ शूट दरम्यान नियमांचा भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. ढिंच्याक पूजाने व्हिडिओ शूट करताना स्कूटर चालवली. मात्र यावेळी रस्त्यावरुन स्कूटर चालवताना तिने हेल्मेट घातले नव्हते. त्यामुळेच एका व्यक्तीने दिल्ली पोलिसांकडे ढिंच्याक पूजाने वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. यामुळे ढिंच्याक पूजावर दिल्ली पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

ढिंच्याक पूजाने ‘दिलों का शूटर, है मेरा स्कूटर’ हे गाणे नेमके कुठे शूट केले आहे, याची माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सूरजमल विहारमध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आल्याची माहिती तक्रारकर्त्याने पोलिसांना दिली आहे. ‘दिलों का शूटर, है मेरा स्कूटर’ या गाण्यात ढिंच्याक पूजाने स्कूटर चालवली आहे. या प्रकरणी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्ली पोलिसांनी तक्रारकर्त्याला दिले आहे.