29 May 2016

‘त्या’ पीडित तरूणीवर दिल्लीत अंत्यसंस्कार

सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झालेल्या पीडित तरूणीचा मृतदेह आज (रविवार) पहाटे सिंगापूरमधून दिल्लीमध्ये आणण्यात आल्यानंतर

नवी दिल्ली | December 30, 2012 11:22 AM

सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झालेल्या पीडित तरूणीचा मृतदेह आज (रविवार) पहाटे सिंगापूरमधून दिल्लीमध्ये आणण्यात आल्यानंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या तरूणीचा मृतदेह आज पहाटे साडेतीनच्या सुमारास एअर इंडियाच्या विशेष विमानाने दिल्लीमध्ये आणण्यात आला. यानंतर आज सकाळी सहाच्या सुमारास तरूणी राहत असलेल्या द्वारका सेक्टर २४ मध्ये तिच्या पार्थिवावर कडक बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री आरपीएन सिंह, पश्चिम दिल्लीचे खासदार महाबल मिश्रा, दिल्लीचे भाजप अध्यक्ष विजेंदर गुप्ता उपस्थित होते. 

First Published on December 30, 2012 11:22 am

Web Title: delhi today funeral of that girl