थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना ‘भारतर’ने सन्मानित करण्याची अधिकृत शिफारस निवृत्त न्यायाधीश के. ईश्व्रय्या यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय इतर मागासवर्गीय आयोगाने केल्याचे समजते. अशीच शिफारस यापूर्वी महाराष्ट्र सरकारनेही केलेली आहे. महात्मा फुले यांच्याबरोबरच बी.पी. मंडल यांनाही भारतर देण्याची शिफारस आयोगाची आहे. इतर मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्याची शिफारस करणारया मंडल आयोगाचे बी.पी. मंडल हे अध्यक्ष होते. अशी शिफारस आयोगाच्या अखत्यारित येत नसल्याने ती केंद्र सरकारवर बंधनकारक नाही; पण त्यामुळे या जुन्या मागणीला बळ मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने यापूर्वीच म. फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतर देण्याची शिफारस केली आहे. याशिवाय काँग्रेसचे हिंगोलीचे खासदार राजीव सातव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी केली होती.