नोटाबंदीचा फटका गोरगरीबांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांनाच बसला असतानाच आता देवदर्शनावरही याचे परिणाम दिसून आले आहेत. नोटाबंदीमुळे तिरुपती बालाजी संस्थानाच्या उत्पन्नात घट झाली असून या पार्श्वभूमीवर संस्थानाने दर्शनाच्या तिकिटाचे दर आणि विविध सेवांसाठी आकारल्या जाणा-या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत मंदिर म्हणून तिरुपती बालाजी संस्थानाला ओळखले जाते. तिरुमाला डोंगरावर वसलेल्या या मंदिरातील देशविदेशातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. पण नोटाबंदीचा फटका या मंदिरातील उत्पन्नाला बसला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार तिरुमाला तिरुपती देवस्थानचे नोटाबंदीपूर्वी दररोजचे उत्पन्न सुमारे ५ कोटी रुपये होते. यामध्ये ठेवींवरील व्याजाचाही समावेश आहे. पण नोटाबंदीनंतर आता या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. सध्या देवस्थानाचे दररोजचे उत्पन्न १ ते २ कोटी रुपयांपर्यंत खाली आहे. उत्पन्नातील ही तफावत भरुन काढण्यासाठी देवस्थानाने तिकिटाचे दर आणि सेवांवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai Municipal Corporation, Issues Notices for Tree Trimming, Prevent Monsoon Accidents, housing societies, bmc sent notice to housing societies,
खासगी भूखंडावरील वृक्ष छाटणीसाठी सोसायट्यांना नोटीस, प्रति झाड ८०० रुपये ते चार हजार रुपये शुल्क
bse listed companies marathi news
गुंतवणूकदार ४०० लाख कोटींचे धनी
mumbai, mhada, judges houses, 9500 per square feet
म्हाडा भूखंडावरील न्यायाधीशांचे घर प्रति चौरस फूट साडेनऊ हजार रुपये!
Gondia Forest Division, Decomposed Body tiger, Tiger Found Dead, Vidarbha, 10 Days, Palandur and Dakshina Deori forest, nagpur, bhandara, jungle, forest department, environment, hunt, marathi news, maharashtra, accident,
गोंदिया वनक्षेत्रात वाघाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; दहा दिवसात तीन वाघ मृत्युमुखी

तिरुपती देवस्थानाच्या तिकिट दरवाढीच्या प्रस्तावाला आंध्रप्रदेश सरकारची मंजुरी मिळणे गरजेचे आहे. यापूर्वी तिरुपती संस्थानाने तिकिट आणि प्रसादच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. मात्र त्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकली नव्हती.
तिरुपतीमध्ये तिकिटाचे दर ५० रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत आहे. बहुसंख्य भाविक विशेष दर्शनासाठीचे ३०० रुपयांचे तिकिट घेतात. तर दररोज सुमारे दोन हजार भाविक व्हीआयपी दर्शनाचे तिकिट घेतात. या तिकिटांमध्ये ५ ते १० रुपयांनी वाढ केल्यास उत्पन्नातील तूट भरुन काढता येईल असे संस्थानामधील पदाधिकारी सांगतात.