पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभारामध्ये सलग दुसऱ्यावर्षी डेन्मार्कने पहिला क्रमांक मिळवला आहे. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’च्या ‘करप्शन पर्सेप्शन्स इंडेक्स’मध्ये डेन्मार्कने १०० पैक ९१ गुण प्राप्त केले. त्याचवेळी उत्तर कोरिया आणि सोमालिया या दोन्ही देशांमध्ये भ्रष्टाचाराचा कळस असल्याचेही या सर्वेक्षणातून दिसून आले. या दोन्ही देशांना १०० पैकी अवघे आठ गुण मिळवता आले आहेत.
या सर्वेक्षणातील लक्षवेधक नोंदी
– सार्वजनिक कारभारातील भ्रष्टाचार ही संपूर्ण जगाला भेडसावणारी समस्या
– अमेरिका आणि इंग्लंड या दोन्ही देशांच्या पारदर्शक कारभारात सुधारणा. या दोन्ही देशांना आतापर्यंतचे सर्वात चांगले गुण
– अमेरिकेला १०० पैकी ७६ गुण. यादीमध्ये अमेरिका १६ व्या स्थानावर
– इंग्लंडला १०० पैकी ८१ गुण. यादीमध्ये दहावा क्रमांक
– इंग्लंडसोबत जर्मनीही दहाव्या स्थानावर
– फिनलंड, स्वीडन, न्यूझिलंड, नेदरलॅंड्स, नॉर्वे, स्वित्झर्लंड, सिंगापूर आणि कॅनडा यांची अनुक्रमे दुसऱ्या ते नवव्या स्थानावर वर्णी
– सार्वजनिक क्षेत्रातील कारभारबद्दल तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या मतांनुसार तयार केली जाते यादी. यादी तयार करताना अनेक घटकांचा विचार केला जातो