डिझेलच्या किमतीत शनिवारी ५० पैशांनी वाढ झाली. गेल्या तीन आठवडय़ातील ही दुसरी वाढ आहे.
नवे तेलमंत्री धमेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अनेक बैठकींनंतर डिझेलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यूपीए सरकारच्या काळात पुढाकारानंतर दरवाढीचे सूत्र मोदी सरकारनेही कायम ठेवले आहे. राज्यातील करांतून डिझेलला वगळण्यात आले आहे. जानेवारी २०१३ मध्ये यूपीए सरकारने हा निर्णय घेतला होता.