जर्मन व भारतीय वैज्ञानिकांचे संशोधन; आणखी काही ठिकाणी जीवाश्म सापडण्याची शक्यता
गुजरातमध्ये जर्मन पुरातत्त्व वैज्ञानिकांसह दोन भारतीयांनी केलेल्या उत्खननात डायनोसॉरचे जीवाश्म सापडले आहेत. कच्छ जिल्ह्यात कासदुनगर टेकडय़ांच्या परिसरात हे उत्खनन करण्यात आले असून तेथे सापडलेले जीवाश्म १६ अब्ज वर्षांपूर्वीचे आहेत. गुजरातमध्ये आणखी १५० भूगर्भीय स्थळे शोधण्यात आली आहेत. जेथे आणखी जीवाश्म सापडू शकतात किंबहुना तेथे प्राचीन अवशेषही मिळण्याची शक्यता आहे.
पुरातत्त्ववैज्ञानिक डी. के. पांडे यांनी सांगितले की, गुजरातमध्ये यापूर्वीही अनेकदा डायनोसॉरचे जीवाश्म सापडले आहेत. डायनोसॉर त्यावेळी सागरी किनाऱ्याच्या प्रदेशात राहात होते. पंधरा वर्षांपूर्वी नसíगक तेल व वायू महामंडळाने केलेल्या उत्खननात डायनोसॉरचे जीवाश्म सापडले होते व आता पुन्हा तसेच जीवाश्म सापडले असून त्यावरून या भागात एकेकाळी डायनोसॉरचे वास्तव्य होते असे दिसून आले आहे. कच्छ जिल्ह्यात नेमके कुठे असे जीवाश्म सापडू शकतील यावर वैज्ञानिक गेली पंचवीस वष्रे संशोधन करीत आहेत. छोटय़ा डायनोसॉरला पंख होते. त्यांच्यापासून उत्क्रांत होत पक्षी तयार झाले असे मानले जाते. यापूर्वी सर्वात जुना पक्षी कावळ्याच्या आकाराचा होता व तो उष्ण रक्ताचा होता असे मानले जाते. त्याचे नाव आर्किओपेट्रिक्स असे असून त्याचा काळ १५ कोटी वर्षांपूर्वीचा मानला जातो. वैज्ञानिकांनी यापूर्वी २१ डॉयनोसॉर प्रजातींची चयापचय क्रिया कशी होती यावर संशोधन केले असून त्यात त्यांच्या शरीराचे वस्तुमान प्रमाण मानले आहे. त्यांच्या मांडीच्या हाडावरून वाढीचा अंदाज घेता आला आहे. झाडांमध्ये जशी खोडात चक्रे असतात त्यांच्यावरून त्यांचे वय काढता येते तसेच डायनोसॉरच्या हाडातही अशी चक्रे दिसतात त्यावरून त्यांचे वजन, आकार, वय सगळे सांगता येते असे वैज्ञानिकांचे मत आहे.
वैज्ञानिकांच्या चमूतील गौरव चौहान यांनी सांगितले की, आम्हाला या ठिकाणाचा अपघातानेच शोध लागला. भूज शहरापासून २५ कि. मी. अंतरावर असलेल्या कासदुनगर येथे आम्हाला हे जीवाश्म सापडले आहेत. ते डायनोसॉरच्या हाता-पायांचे हाडांपासून बनलेले आहेत. कार्बन डेटिंग तंत्राने ते किती जुने आहेत ते सांगता येईल त्यावर जर्मनीचे फ्रान्झ फरसिच व डॉ. मॅथियस अल्बर्टी काम करीत आहेत. यापूर्वी बालसिनोर या अहमदाबादपासून १०० कि. मी. अंतरावर असलेल्या महिसागर जिल्ह्यातील गावात डायनोसॉरची अंडी सापडली आहेत. नर्मदेच्या किनारी डायनोसॉरचे जीवाश्मही सापडले आहेत.

डायनोसॉरचे जीवाश्म
* गुजरातमधील किनारी भागात डायनोसॉरचे वास्तव्य
* पंचवीस वष्रे जीवाश्म सापडणाऱ्या ठिकाणांचा शोध
* कच्छ जिल्ह्यात जीवाश्म सापडले
*आताचे जीवाश्म १६ अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याचे संशोधनात स्पष्ट

Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?
As the temperature rises in the state of Maharashtra there is also an increase in the type of heat stroke pune
उष्माघाताच्या धोका! राज्यात रुग्णसंख्या ७७ वर; जाणून घ्या सर्वाधिक धोका कुठे…
statue of Gond raje Bakt Buland Shah the founder of Nagpur city is Neglected by government
नागपूर नगरीच्या राजाची अजूनही उपेक्षाच!
Development of six villages
बीकेसीच्या धर्तीवर मढ, मार्वेसह सहा गावांचा विकास लांबणीवर?