बाळाचे जावळ, मुंजीतील केशवपन, अंत्यविधीदरम्यान करण्यात येणारे मुंढण अशा विविध कारणांसाठी डोक्यावरील पूर्ण केस काढण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत पाहायला मिळते. देशातील अनेक मंदिरांमध्ये केस चढविण्याची प्रथा अस्तितावात आहे. दक्षिणेतील तिरुपती बालाजी मंदिसासमवेत देशातील अनेक मंदिरांमध्ये नवस पूर्ण झाल्यावर केस चढविण्यासाठी लागलेल्या रांगा पाहायला मिळतात. अशा ठिकाणी दररोज शेकडो टन केस जमा होतात. हे केस विकून मंदिरांना लाखो रुपयांचा फायदा होतो. दरम्यान या केसांचे काय होते हे तुम्हाला माहित आहे का? याचा वापर कोण करतात आणि या केसांना वापरायोग्य कसे केले जाते? लंडन अथवा विदेशातील अन्य बाजारात हे केस कसे पोहोचतात?

या केसांची लंडनवारी त्या मंदिरापासून सुरू होते जिथे ते चढवले जातात. आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय केसांना अधिक दर मिळतो, भारतीय केसांना ‘व्हर्जिन हेअर’ (स्पर्श न झालेले केस) संबोधण्यात येते. यामागेदेखील महत्वाचे कारण आहे. अनेक भारतीय केसांना रंगविण्यापासून अथवा डाय करण्यापासून दूर राहणे पसंत करतात. मंदिरात केस चढविणारे अनेक मध्यमवर्गिय आणि गरीब भाविक हेअर स्टाईलदेखील करत नसल्याने त्यांचे केस हे नैसर्गिक अवस्थेत असतात. याव्यतिरिक्त लहानपणापासून वाढविण्यात आलेल्या केसांमध्ये केराटीनची मात्रा अधिक असते. केसांमधील या पोषक पदार्थामुळे केसांचे स्वास्थ चांगले राहाते. याकारणासाठी या केसांना ‘व्हर्जिन हेअर’ असे म्हटले जाते.

dubai flood
Dubai Flood: दुबईची झाली डुबई! दोन वर्षांचा पाऊस एकाच दिवसात, वाळवंटात आला पूर, पाहा VIDEO
Mumbai airport, Take-off and landing,
महत्त्वाचे : मुंबई विमानतळावर ९ मे ला टेकऑफ – लँडिंग तब्बल सहा तास बंद रहाणार, वाचा सविस्तर…
new international cricket stadium in thane marathi news
ठाण्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान? ‘एमसीए’ची एकमेव निविदा दाखल
Drug supply to Delhi
अमली पदार्थ प्रकरणातील शोएबकडून दोनदा दिल्लीस कोट्यवधींचा पुरवठा

मंदिरात चढवलेल्या केसांना पुढील प्रक्रियेसाठी कारखान्यात नेण्यात येते. पहिल्या टप्प्यात केसांना हातांनी चाळले जाते. लाखो टन केस हाताने सुटसुटीत करणे फार कठीण आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. पातळ सुईचा वापर करून हे काम करण्यात येते. त्यानंतर केस पुढील प्रक्रियेसाठी तयार होतात. नंतर लोखंडी कंगव्याने झाडून हे केस साफ करण्यात येतात. पुढे त्यांच्या लांबीनुसार बंडल बांधण्यात येतात. केसांना किटाणुरहीत करण्यासाठी केसांच्या या बंडलांवर रासायनिक प्रक्रिया करण्यात येते. पुढील टप्प्यात चांगल्या गुणवत्तेच्या केसांना ऑस्मोसिस बाथ दिला जातो. जेणेकरून केसांमधील क्युटिकल्स नष्ट न होता त्यावरील डाग आणि अन्य नको असलेले घटक नष्ट होतील. या स्वच्छ आणि उत्तम गुणवत्तेच्या केसांपासून महिला आणि पुरुषांसाठीच्या विगची निर्मिती करण्यात येते. अधिक मागणी असलेल्या देशांमध्ये त्यांची निर्यात केली जाते.

भेसळयुक्त विगपेक्षा मानवी केसांचा वापर करून निर्माण करण्यात आलेल्या गुणवत्तापूर्ण विगची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात खूप जास्त आहे. हे विग खूप महाग असल्याने याला ‘काळे सोने’ म्हणूनदेखील संबोधले जाते.