सोशल मीडियावर अलिकडे एक व्हिडिओ चर्चेचा विषय झाला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन कुत्रे एकमेकांशी लढतांना दिसतात. सुरुवातीला अगदी साधारण वाटणारी ही लढत हळूहळू रस्त्यावर लोकांची गर्दी जमा करते. पोलीसदेखील घटनास्थळी दाखल होतात. एकमेकांच्या जीवावर उठलेल्या या दोन कुत्र्यांची लढत थांबविण्यासाठी उपस्थित लोक खूप प्रयत्न करतात. लाथा आणि दांडूक्याने मारण्यापासून ते स्प्रे मारण्यापर्यंत सर्व प्रयत्न करून देखील एकमेकांना भीडलेले हे कुत्रे एकमेकांपासून वेगळे व्हायचे नाव घेत नाहीत. बराच काळ प्रयत्नांची शर्त केल्यानंतर अखेर ही जीवघेणी लढाई संपुष्टात आणण्यात उपस्थितांना यश येते. फेसबुकवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला अत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आहे.

व्हिडिओ