ट्रम्प यांची टीका

अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यावर अमेरिकेत असलेल्या अस्वस्थतेची जबाबदारी आहे, कारण पोलिसांनी कृष्णवर्णीयांवर गोळीबार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत त्यावर त्यांनी अप्रत्यक्ष शिक्कामोर्तब केले आहे, असे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अमेरिकेतील पोलीस वंशविद्वेषी आहेत असे समाजात बोलले जाते त्याला माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्या वक्तव्यातून पाठबळ मिळत आहे ही बाब दुर्दैवी आहे, असे सांगून ते म्हणाले की, अल्पसंख्याक असलेल्या लोकांना अमेरिकेत लक्ष्य केले जात आहे, त्यात कृष्णवर्णीयांचा समावेश आहे. देशाच्या नेत्याची भूमिका ही दुसऱ्याच्या भूमिकेत जाऊन एखाद्या समस्येचा विचार करण्याची असली पाहिजे. हिलरी क्लिंटन यांनी त्यांना पाठिंबा देणाऱ्या व्यक्तींचा निषेध केला आहे, मी मात्र पाठिंबा न देणाऱ्यांसह सर्वाना अमेरिकी नागरिक मानतो. प्रत्येकाला कायद्यानुसार समान अधिकार आहेत. आपण पोलिसांबरोबर काम केले पाहिजे पोलिसांच्या विरोधात नव्हे. रस्त्यावरील दंगली हा शांततामय समाजाला धोका आहे. या हिंसक निदर्शनांचे बळी हे कायदा पाळणारे आफ्रिकी अमेरिकी लोक आहेत.