रिपब्लिकन हिंदू कोअ‍ॅलिएशनचा देशात कार्यविस्ताराचा मनसुबा

न्यूयॉर्कच्या ‘मॅडिसन स्क्वेअर’मधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा धमाकेदार कार्यRम आठवतोय? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दिल्ली किंवा मुंबईमध्ये अगदी तसाच जंगी कार्यRम झाल्यास आश्र्च्र्य वाटू नये.. कारण ‘ओव्हरशीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या माध्यमातून भाजपने अमेरिकेसह अनेक देशांमध्ये ज्यापद्धतीने पाय पसरले, त्याच धर्तीवर ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाची एकप्रकारे शाखा बनलेली ‘रिपब्लिकन हिंदू कोअ‍ॅलिएशन’ (आरएचसी) ही अमेरिकेतील उजव्या विचारसरणीच्या भारतीयांची संघटना भारतामध्ये स्वत:चे जाळे विणण्याच्या विचारात आहे..

‘अब की बार, मोदी सरकार’च्या तालावर ‘अब की बार, ट्रम्प की सरकार’ अशी अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीतील सर्वाधिक लक्षवेधक जाहिरात करणारे, अमेरिकेतील भारतीयांचा डेमॉRॅटिक पक्षाकडे असलेला पारंपरिक ओढा लक्षणीय प्रमाणात ट्रम्प यांच्याकडे वळविण्यात मोठे यश मिळविलेले आणि आता ट्रम्प प्रशासनामध्ये अमेरिकेचे भारतातील राजदूतपद मिळविण्याच्या शर्यतीत असलेले ‘रिपब्लिकन हिंदू कोअ‍ॅलिशन’चे प्रमुख शलभ ‘श्ॉली’ कुमार यांनी या माहितीस अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला. भारतातील प्रमुख शहरांमध्ये ‘आरएचसी’च्या जाळे विणण्यासाठी ते काही खासदार, बडे उद्य्ोगपती आणि व्यवस्थापन तज्ज्ञांच्या संपर्कात असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

मूळचे अमृतसरचे असलेले आणि आता शिकागोस्थित शलभ कुमारांचा सध्या बहुतांशवेळा दिल्ली आणि मुंबईतच डेरा असतो. मोदी सरकारमध्ये त्यांची मोठी उठबस असल्याचे मानले जाते. किंबहुना ट्रम्प आणि मोदी यांच्यातील दुवा असेही काहीजणांकडून त्यांचे वर्णन केले जाते. भारतातील चंचूप्रवेशाबाबत थेट न बोलता ते म्हणाले, ‘अमेरिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा देण्यासाठी ‘रिपब्लिकन जेविश कोअ‍ॅलिएशन’ची स्थापना झाली. त्याद्वारे ज्यू मंडळी रिपब्लिकन पक्षाला पाठिंबा देतात.

‘रिपब्लिकन मुस्लिम कोअ‍ॅलिशन’सुद्धा स्थापन झाला. मग हिंदूंचा दबाव गट का नको? म्हणूनच आम्ही त्या धर्तीवर आम्ही ‘रिपब्लिकन हिंदू कोअ‍ॅलिशन’ची मूहूर्तमेढ रोवली. अमेरिकेतील भारतीय साधारणत: डेमॉRॅटिक पक्षाशी जोडलेत. पण आमच्या संघटनेमुळे (अ‍ॅडव्होकसी ग्रुप) आम्ही भारतीयांची ६५ टक्के मते ट्रम्प यांच्याकडे वळविली. सुमारे दहा लाख लोकप्रिय मतांचा फायदा ट्रम्प यांना झाला.”ओव्हरशीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या माध्यमातून भाजपने अमेरिका, युरोप आणि अन्य प्रमुख देशांमध्ये हितचिंतकांचे जाळे निर्माण केले आहे.

आम आदमी पक्षानेही (आप) त्याच पद्धतीने अनिवासी भारतीयांमध्ये चांगलाच जम बसविला आहे. हेच ‘रिव्हर्स मॉडेल’ शलभ कुमारांच्या डोक्यात असल्याचे दिसते. त्या दिशेने त्यांच्या पावले पडत आहेत.

आरएचसीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, मुक्त व्यवसायस्वातंत्र्य, वित्तीय शिस्त, कौटुंबिक मूल्ये आणि ठाम परराष्ट्र धोरण हे ‘आरएचसी’चे चार प्रमुख विचारस्तंभ आहेत.

मतपेढीची मदतीने व्यापारी संबंध

अमेरिकेतील भारतीयांची, त्यातल्या त्यात हिंदूंची घट्ट मतपेढी तयार करून अमेरिका- भारत यांच्यातील व्यापार, परराष्ट्र व संरक्षण धोरणांना अधिक चालना देण्यासाठी आरएचसीच्या रूपाने दबावगट तयार केल्याचे शलभ कुमारांचे म्हणणे आहे. ‘अमेरिकेत अडीच कोटींहून अधिक हिंदू आहेत. सर्वाधिक उच्चविद्यविभूषित समाज आहे. सातपैकी एक उद्य्ोजक हिंदू असतो. सर्वाधिक प्रतिव्यक्ती उत्पन्नही हिंदूंचे आहे. ते कोणत्याहीप्रकारे अमेरिकी सरकारच्या मदतीवर अवलंबून नाहीत. याउलट त्यांच्याकडून अमेरिकी सरकारला दरवर्षी सुमारे पन्नास अब्ज डॉलरचा (अंदाजे साडेतीन लाख कोटी रूपये) कर मिळतो. या प्रभावाच्या आधारे दोन्ही देशातील व्यापारी, आर्थिक संबंध अधिक घट्ट करण्यास सर्वोच्च प्राधान्य आहे,’ असे ते म्हणाले.