मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- द्रुतगती महामार्गावर अपघातात महाबळेश्वरच्या चौघांचा मृत्यू
- कोल्हापूरची टोल आकारणी कृती समितीच्या चर्चेनंतर- हर्षवर्धन पाटील
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- फेरतपासणीची लांबलचक प्रक्रिया टाळण्यासाठी डीन समितीच्या सूचना
- व्यावसायीकरणामुळे माध्यमे वास्तवापासून दूर -पी. साईनाथ
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
भारतीय जनता पक्षाने अद्याप आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केलेला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्याची घाई कोणीही करू नये, असे पक्षाचे अध्यक्ष राजनाथसिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले.
भाजपचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, याचा निर्णय पक्षाच्या संसदीय मंडळामध्ये घेतला जाईल. पक्षसदस्यांनी याबाबतच्या प्रश्नाचे उत्तर संसदीय मंडळावर सोपवावे, असे राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. भाजपमधील काही नेते गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारीबद्दल आपली मते व्यक्त करीत आहेत. त्यापार्श्वभूमीवर राजनाथसिंह यांनी वरील वक्तव्य केले.
पुढील वर्षी होणाऱया लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून मोदी यांचे नाव जाहीर करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. मोदी यांनाच पंतप्रधानपदाची उमेदवारी द्यावी, यासाठी काही हिंदूत्त्ववादी संघटनाही सक्रिय झाल्या आहेत. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष असलेल्या संयुक्त जनता दलाचा मोदी यांच्या उमेदवारीला विरोध आहे. जनता दलाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याकडेही राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून बघितले जाते आहे.




















खरं आहे,भाजपचे काही नेते मोदींना पुढे करण्यासाठी नुसते उतावीळ झाले आहेत.अशा अतिउत्साहीना आवर घालण्याची आज खरी गरज आहे.
मुख्य म्हणजे,काँग्रेसला हटवण्यापलीकडे एनडीएकडे दुसरा कोणता बरं एजेन्डा आहे? जगात भारताची मान उंचावेल.देशात खरोखरच काही सुधारणा होतील अशा कोणत्या योजना ह्यांच्याकडे आहेत बरं? नुसता मोदी,मोदी नावाचा जप करून काही सत्ता मिळणार नाही आहे.त्यासाठी प्रथम लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल.