जैसलमेर जिल्ह्य़ात रैको की धानी येथे एका मंदिरात मोबाईल चार्जिग करत असताना सरकारी प्राथमिक शाळेच्या शिक्षकाचा मृत्यू झाला, त्याला विजेचा धक्का बसल्याचे समजते.
राजू राम जाट हा मंदिरात गेला होता. तेथे मोबाईल चार्ज करण्यासाठी त्याने चार्जर लावला असता विजेचा धक्का बसून तो मरण पावला. शाळेत मोबाईल चार्जिगची व्यवस्था नसल्याने हा शिक्षक मंदिरात गेला होता.