रशियात अतिपूर्वेकडे ७ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला असून, अमेरिकी व रशियाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप यात नुकसानीचे वृत्त नाही. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्रीय पाहणी केंद्राने म्हटले आहे, की रशियाच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर कामचास्की क्राई या पर्वतराजीत भूकंपाचे केंद्र १६० किमी खोलीवर होते.
रशियाच्या आपत्कालीन स्थिती निवारण केंद्राच्या स्थानिक केंद्राने या भूकंपाचा उगम वायव्येकडे पेट्रोपावलोस्क-कामचास्की या भागापासून ८७ किमी तर येलझिवोच्या वायव्येकडे ८४ किमी अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. जास्त लोकसंख्येच्या भागात ५ रिश्टर तीव्रतेचा धक्का बसला त्यामुळे फार हानी झाली नाही.
रशियन विज्ञान अकादमीने म्हटले आहे, की पहिल्या धक्क्यानंतर ५.२ रिश्टर तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप प्रशांत महासागरातील रिंग ऑफ फायर या प्रस्तरभंगाच्या भागात झाला असून, तेथे नेहमी भूकंप होत असतात व ज्वालामुखी फुटत असतात. राष्ट्रीय व प्रशांत महासागर त्सुनामी इशारा केंद्राने म्हटले आहे, की त्सुनामीचा धोका नाही.