समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी राज्यातील शिक्षकांवर मतदानासाठी दबाव आणल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्याविरुद्ध कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. उत्तरप्रदेश शासनाकडून कंत्राटी पद्धतीवर नोकरीसाठी ठेवण्यात आलेल्या शिक्षकांनी लोकसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाला मतदान करावे अन्यथा कामावरून त्यांची हकालपट्टी करण्याची धमकी मुलायमसिंह यांनी एका जाहीर सभेत दिली होती. त्यानंतर प्राथमिक पुराव्यांच्या आधारे कारवाई करताना निवडणूक आयोगाने मुलायमसिंह यांना  स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी मुलायमसिंह यांना येत्या रविवारपर्यंतची मुदत देण्यात आली. तसेच निवडणूक आचारसंहितेच्या काळात केंद्र किंवा राज्यसरकार आपल्या प्रचारासाठी सत्तेचा वापर करू शकत नाही याची आठवण निवडणूक आयोगाने मुलायमसिंह यांना करून दिली.