काळ्या पैशाच्या अफरातफरीप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीदरम्यान वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगन मोहन रेड्डी यांच्यावर मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने नव्याने कारवाई करताना त्यांच्या सुमारे १४३.७४ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली.
याप्रकरणी याअगोदर यासंबंधात करण्यात आलेल्या दोन आदेशांत रेड्डी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या ५१ आणि ७१ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर टांच आणण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत आर्थिक व्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करताना अंमलबजावणी संचालनालयाने रेड्डी आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सुमारे १४३.७४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात जगन मोहन यांनी बरीच माया जमवली. अवाजवी संपत्ती बाळगल्याप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाच्या एफआयआरनुसार सक्त वसुली संचालनायतर्फे ही कारवाई सुरू आहे.