एका धार्मिक महासोहळ्यात जनावरांच्या बेसुमार कत्तलीबद्दल टीका करून इस्लामचा कथित अवमान करणाऱ्या महिला लेखिकेविरुद्ध खटला लादण्यात आला आहे. या खटल्याच्या सुनावणीसाठी सरकारी वकिलाने शिफारस केली आहे.
‘ईद अल अधा’ या सोहळ्यादरम्यान ऑक्टोबरमध्ये फातिमा नाऊत या लेखिकेने आपल्या ‘फेसबुक’वरील पानावर ‘आनंदी हत्याकांड’ शीर्षकाखाली कत्तलीबाबत जोरदार टीका केली. या सोहळ्यात जनावरांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल केली जाते.
५० वर्षीय नाऊत या मुस्लिम आहेत. फेसबुकवरील आपल्या ‘पोस्ट’बाबत वाद उपस्थित झाल्यानंतर तिने ‘पोस्ट’ काढून टाकली आहे. परंतु पोलिसांमार्फत झालेल्या चौकशीत तिने फेसबुकवरील ते मत आपलेच असल्याचे कबूल केले आहे.