प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी १९४५ रोजी एका अमेरिकी सैनिकाला एका लेखाबाबत स्पष्टीकरण करणारे पत्र लिहिले होते ते अप्रसिद्ध पत्र लिलावात विकले जाणार असून त्यात ४०००० अमेरिकी डॉलर इतकी किंमत ठेवण्यात आली आहे.
  अवकाश हे चार मितींचे आहे. आइनस्टाइनने एका लेखात म्हटले होते त्या लेखातून आपल्याला अर्थबोध झाला नाही असे पत्र सैनिकाने आइनस्टाइनला लिहिले होते. त्यावर आइनस्टाइनने सरजट फ्रँक के.प्लीगोर व त्याच्या मित्रांना हे पत्र उत्तरादाखल  लिहिले होते व त्यात त्यांच्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला होता. आइनस्टाइन हा विसाव्या शतकातील एक प्रज्ञावान शास्त्रज्ञ होता व त्याने सैनिकांच्या गटाने लिहिलेल्या पत्रानंतर अवघ्या एक महिन्यात त्याला उत्तर दिले. आइनस्टाइनचे मूळ पत्र १७ एप्रिल १९४५ रोजीचे असून ते टाइप केलेले एक पानाचे पत्र आहे. जेरूसलेम विद्यापीठात हे पत्र आइनस्टाइन पेपर्सच्या अवशेषात सापडले असे फॉक्स न्यूज डॉट कॉमने सांगितले.
 असे समजले जात होते की, या पत्राला आइनस्टाइनने उत्तरच दिले नाही पण या पत्राचा शोध प्लीफगोर कुटुंबीयांना लागला व ते आता पेनसिल्वानिया येथील ऐतिहासिक कागदपत्र संग्राहक असलेल्या द राब कलेक्शन येथे ठेवण्यात आले आहे. आइनस्टाइनने या पत्रात म्हटले आहे की, तुमचे सतरा एप्रिलचे पत्र हे माझ्या आधीच्या लेखासंदर्भात शंका विचारणारे आहे. आपण अवकाश हे चार मितीतून बघण्याला प्रश्नांकित केलेले नाही. त्यात एवढाच प्रश्न उपस्थित केला होता की, सैद्धांतिक कल्पनांच्या आधारे भौतिक गुणधर्म ठरवताना चार चलांचा विचार केला जाऊ शकतो.
आइनस्टाइनने प्लीगोर  व त्यांच्या मित्रांना पत्राद्वारे आइनस्टाइनने लेखाचे स्पष्टीकरण केले आहे. हा लेख आइनस्टाइनने १९४४ मध्ये सायन्स डायजेस्टमध्ये लिहिला होता. त्यात त्याने स्वत:च्याच १९१५ मध्ये मांडलेल्या विश्वाला चार मिती असलेल्या सिद्धांताच्या फेरविचाराची गरज व्यक्त करताना आठ मिती असल्याचे सूचित केले होते. त्यावेळी दुसरे महायुद्ध सुरू होते व प्लीगोर व त्याचे सहकारी सैनिक हे फिलीपीन्समध्ये लढत होते.