जम्मू- काश्मीरमधील पुँछमध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याचे वृत्त आहे. पुँछमधील मेंढर सेक्टर परिसरात सुरु असणाऱ्या चकमकीमध्ये जम्मू पोलिस दलातील एक जवान जखमी झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मेंढर परिसरात तीन दहशतवादी लपून बसले असून भारतीय लष्करांनी त्यांना घेराव घातला आहे. भारतीय लष्कराने बुधवारी रात्री  पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन सहा ते सात दहशतवादी तळांचा खात्मा केला होता. लष्कराने केलेली ही कारवाई उरी हल्ल्याचे चोखप्रत्तुत्तर मानली जाते. लष्कराने  केलेल्या या कारवाईचा देशभरात आनंदोत्सव सरु असताना प्रत्यक्ष सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहेत.