पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी जगातील सर्वात उंच युद्धभूमी असा लौकीक असलेल्या सियाचिनमध्ये तैनात भारतीय सैनिकांची भेट घेतली आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सव्वाशे कोटी देशबांधव सीमेवरील जवानांच्या पाठीशी असल्याचंही मोदी यावेळी म्हणाले. तसेच दिवाळीच्या निमित्ताने मोदी यांनी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनाही शुभेच्छा दिल्या.
नरेद्र मोदी जम्मू-काश्मीरमधील पूरग्रस्थांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी श्रीनरगला रवाना झाले आहेत. त्याआधी त्यांनी सियाचिन येथे जाऊन भारतीय सैनिकांची भेट घेतली. जगातील सर्वात उंच युद्धभूमी असो वा अतिशय कडाक्याच्या थंडीचे ठिकाण, भारतीय सैनिक येथे उभे आहेत आणि देशसेवा करत आहेत ही आमच्यासाठी गौरवपूर्ण बाब आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.