भविष्यनिर्वाह निधीच्या पाच कोटींहून अधिक सदस्यांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधीवर यंदाच्या आर्थिक वर्षांसाठी साडेआठ टक्के व्याज देण्याची घोषणा कामगार भविष्यनिर्वाह निधी मंडळाने सोमवारी केली. याआधी हा दर सव्वा आठ टक्के होता. केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये यासंबंधी निर्णय घेण्यात आला.भविष्यनिर्वाह निधीच्या सदस्यांना साडेआठ टक्के व्याज देण्याचा निर्णय झाला आहे, परंतु या निर्णयावर आमचे काही आक्षेप आहेत, कारण आम्हाला आणखी वाढीव दराने व्याज अपेक्षित होते, असे ‘आयटक’चे सचिव डी.एल. सचदेव यांनी सांगितले.