भाजपचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांचे शनिवारी सिकंदराबाद येथील रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. २००१मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या काळात शस्त्रास्त्रे करार करताना लक्ष्मण यांनी एक लाख रुपयांची लाच घेतली होती. ‘तेहेलका’ने हे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर त्यांना भाजपच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले होते.
गेल्या अनेक वर्षांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी पहाटे हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.