मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- सोलापुरात मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी महापालिकेकडून रेल्वेला प्रस्ताव
- विधवा अपंग महिलेच्या घराला महिला सावकाराने ठोकले कुलूप
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- गैरव्यवहाराच्या भोवऱ्यात नाशिक जिल्हा बँक संचालक मंडळाच्या गटांगळ्या
- कुत्र्यांच्या मदतीने हरणांच्या शिकारीचा संशय
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास चिरडणारा ट्रक जमावाने पेटवला
- वाढत्या औद्योगिकीकरणामुळे प्रदूषण नियंत्रणाचा बोजवारा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
'भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला वेळीच आवर घाला अन्यथा हा भस्मासुर संपूर्ण देशाला गिळंकृत करेल', असा इशारा दिला आहे मावळते अध्यक्ष हू जिंताओ यांनी. पक्षाच्या बैठकीसाठी संपूर्ण देशभरातून आलेल्या २२७० कॉम्रेड्समोर निरोपाचे भाषण करताना जिंताओ यांनी चीनसमोरील अनेक आव्हानांचे चित्र मांडले.
'सध्या भ्रष्टाचाराने देशाला पोखरले असून पक्षपातळीपर्यंत ही कीड फोफावली आहे. या भस्मासुराला वेळीच आवर घातला नाही तर संपूर्ण पक्षव्यवस्था आणि देश कोसळायला वेळ लागणार नाही अशा स्पष्ट शब्दांत जिंताओ यांनी इशारा दिला. पक्षातील भ्रष्टाचारी नेत्यांची बिलकूल गय करू नका. त्यांची सखोल चौकशी करा आणि दोषी आढळले तर कठोर शिक्षा करा' असे जिंताओ म्हणाले. त्यांचा रोख पक्षातून हकालपट्टी झालेले सर्वोच्च नेते बो झिलाई यांच्याकडे होता. 'सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावरून जनमत तापलेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जनक्षोभ झाल्याची उदाहरणे आहेत. अशा परिस्थितीत पक्षाची राजकीय पकड सैल होण्याचा धोका आहे. मात्र, ही पकड मजबूत करणे ही काळाची गरज असून त्यातच चीनचे हित सामावले असल्याचे जिंताओ यांनी स्पष्ट केले.
पाश्चिमात्य लोकशाही नकोच
नवे सरकार अधिकाधिक खुले आर्थिक धोरण स्वीकारेल याचे संकेत देताना मात्र जिंताओंनी लोकशाहीला देशाची कवाडे कधीच खुली केली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. पाश्चिमात्य लोकशाही चीनला कधीच नको होती आणि तिचा स्वीकार यापुढेही केला जाणार नाही असे ते म्हणाले.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















