काँग्रेसच्या गरिबी हटाओनंतर भाजपची नवी घोषणा; सुधारणांना गरीब कल्याणकारी योजनांचा चेहरा

शेती व महिला सक्षमीकरण यांच्यावर भर, दलित-आदिवासी- इतर मागासवर्गीयांना शिक्षण, आरोग्य व नोकरयांमध्ये प्राधान्याने संधी असा गरीब कल्याणकारी कार्यRम भाजपशासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये शनिवारी निष्टिद्धत करण्यात आला.  वस्तू व सेवा करासारखा (जीएसटी) आर्थिक सुधारणांचे धोरण राबवित असतानाच सरकारचा चेहरा गरीबांना आपला वाटावा, अशी धोरणात्मक मांडणी करण्याचा म्हणजेच ‘कल्याणकारी राज्या’च्या संकल्पनेची आपल्या सोयीने फेरमांडणी करण्याचाही निर्णय घेण्यात आला.

भांडवलदारधार्जिणे असल्याचा भाजपवर जुनाच शिक्का आहे. नरेंद्र मोदी यांच्या सरकार त्याला अपवाद नाही. या पाष्टद्ध भूमीवर एकीकडे आर्थिक सुधारणांचा अजेंडा राबवित असतानाच गरीबांचे सरकार अशी प्रतिमानिर्मितीवर भर देण्यात येणार आहे. तसे स्पष्ट आदेश पहिल्यांदा अध्यक्ष अमित शहा यांनी दिले आणि नंतर सायंकाळच्या भाषणात मोदींनी त्याचीच री ओढली.

केंद्राच्या सर्व कल्याणकारी योजनांची आदर्श अंमलबजावणी करण्याबरोबरच भाजपशासित राज्यांसाठी काही समान योजना राबविण्याचेही ठरविण्यात आले आहे. त्याचबरोबर अन्न, वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजांमध्ये शिक्षण व रोजगाराचा समावेश करण्याचा धोरणात्मक निर्णयही घेण्यात आला. एकूणच गरीबांच्या कल्याणाचा भरीव कार्यRम निष्टिद्धr(१५५)त करण्यासाठी समितीही स्थापण्यात आली. त्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबीर दास आणि खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांचा समावेश आहे.

देशाच्या ५१ टक्के भूभागांवर आणि ३७ टक्के लोकसंख्येवर भाजपचे सरकार आहे.  मोदी सरकारच्या ८०पैकी ६५ योजना राज्यांकडूनच राबविल्या जातात. राज्यांच्या कामगिरीवर देशाची कामगिरी अवलंबून असल्याचे शहा यांनी सांगितले.

सुशासन आणि गरीबांचे कल्याण या मध्यवर्ती संकल्पनेबाबत भाजपच्या सर्व मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांबरोबर महत्वाचे केंद्रीय मंत्री, वरिष्ठ पदाधिकारी दिवसभराच्या बैठकीसाठी उपस्थित होते.

सदन बहोत सुंदर, बनानेवाला अंदर..

या बैठकीच्या निमित्ताने भाजपची बडी मंडळी प्रथमच नव्या महाराष्ट्र सदनात आली होती. या शानदार, भव्य सदनाची कीर्ती अनेकजण ऐकून होते. पण त्यातील बहुतेकांनी त्याचा प्रथमच अनुभव घेतला. त्यावर एक भाजपचा नेता न राहवून म्हणाला, ‘ये सदन बहोत है सुंदर.. (लेकिन) बनानेवाला गया अंदर..’ या नेत्याचा रोख सध्या तुरुंगात असलेल्या छगन भुजबळ यांच्याकडे होता. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना हे सदन बांधले गेले; पण त्यात झालेल्या भ्रष्टाचाराने भुजबळांना सध्या तुरुंगात जावे लागले आहे.

सबकुछ महाराष्ट्र..

भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची ही बैठक म्हणजे सबकुछ महाराष्ट्र अशी होती. ही बैठक भाजपच्या सुशासन विभागाने आयोजित केली होती. खासदार विनय सहष्टद्धr(२२९बुद्धे हे त्याचे निमंत्रक. आयोजित केली ती कस्तुरबा गांधी रस्त्यावरील नव्या महाराष्ट्र सदनात. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यजमान. आणि राजकीयदृष्टय़ा सर्वांत लक्षणीय म्हणजे या बैठकीची माहिती देण्यासाठी फडणवीसांनाच पाठविण्यात आले. भाजपच्या राष्ट्रीय व्यासपीठावरून फडणवीस प्रथमच बोलले. एरव्ही अशी माहिती केंद्रातील वरिष्ठ मंत्री किंवा नेते देत असतात. जेवणाचा थाटबाटही अस्सल मराठी होता.  ही बैठक म्हणजे ‘सबकुछ महाराष्ट्र’ अशी ठरली..