अमेरिका, आशिया, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या भागांत फेसबुक ४० मिनिटे बंद पडल्याने अनेक नेटकर बेचैन झाले होते. सामाजिक माध्यमातील मोठी सेवा असलेल्या इन्स्टाग्राम या सेवेलाही त्याचा फटका बसला.
इन्स्टाग्रामने ट्विटरवर म्हटले आहे, की आमची सेवा बंद पडली होती हे आम्हाला माहीत आहे व त्यावर आम्ही उपाययोजना करीत आहोत. फेसबुककडून मात्र कुठलेचे उत्तर ताबडतोबीने आलेले नाही. फेसबुकचे १.२५ अब्ज वापरकर्ते असून इन्स्टाग्रामचे तीस कोटी वापरकर्ते आहेत.
फेसबुक बंद पडल्याची बातमी ट्विटर या प्रतिस्पर्धी संकेतस्थळाला जागे करणारी ठरली. आशिया व इतर अनेक देशांत फेसबुक पाहता येत नव्हते. काही ठिकाणी ती अत्यंत कमी गतीने पडद्यावर अवतरत होती. किमान चाळीस मिनिटे अमेरिका, आशिया, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या भागांतील नेटकरांनी बेचैनीत काढले.