भारतात दूरसंचार नियमन प्राधिकरणाने(ट्राय) नेट न्यूट्रॅलिटीच्या बाजूने दिलेला निकाल वसाहतवादी धोरणांच्या विरोधातील असून, भारत जर ब्रिटीशांच्या सत्तेखाली असता तर त्या देशाचे कल्याण झाले असते, अशा भाषेत फेसबुक कंपनीच्या संचालक मंडळातील मार्क अँडरसर आणि बेनेडिक्ट इव्हान्स यांनी ‘ट्राय’च्या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली.
वसाहतवादी धोरणांच्या विरोधामुळे कित्येक दशके भारताचे मोठे नुकसान झाले. त्यातच भारत सरकार देखील अनेक वादग्रस्त निर्णय घेत आहे. ब्रिटीश सत्तेत असते तर भारताचे कल्याण झाले असते, असे अँडरसनने ट्विट केले.
दरम्यान, फेसबुकच्या सीईओंनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर नेटिझन्सने संताप व्यक्त केला आहे, तर फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग याने कंपनीच्या सीईओंनी केलेले वक्तव्य कंपनीचे अधिकृत मत नसून, त्यांनी केलेल्या वक्तव्यावर नाराज झाल्याचेही मार्कने म्हटले आहे.