निवडणूक आयोगाने नव मतदार नोंदणीसाठी एक विशेष अभियान सुरू केले आहे. त्यासाठी फेसबुकच्या मदतीने ‘व्होटर्स रजिस्टेशन रिमायंडर’ सुरू करण्यात येणार आहे. अधिकृत निवेदनानुसार, १ जुलैपासून फेसबुकवर मतदार बनण्यासाठी पात्र लोकांनी व्होटर रजिस्ट्रेशन रिमायंडर संदेश पाठवण्यात येणार आहे.

हा रिमांयडर इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती, तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, बंगाली, उर्दू, आसामी आणि उडियामध्ये असेल. लोकांना ‘रजिस्टर नाऊ’ बटनवर जाऊन क्लिक केल्यानंतर नॅशनल सर्व्हिस पोर्टलवर रिडायरेक्ट केले जाईल. तिथे त्यांना रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी सूचना दिल्या जातील. मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसीम झैदींनी या अभियानावर आनंद व्यक्त करत निवडणूक आयोगाचा उद्देश पूर्ण करण्यासाठीचे हे एक पाऊल असल्याचे म्हटले.

ते म्हणाले, मी सर्व पात्र नागरिकांना नोंदणी आणि मतदानाचा आग्रह करतो. मला विश्वास आहे की, निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी अभियानाला यामुळे बळकटी मिळेल आणि भावी मतदारांना निवडणूक प्रक्रियेत भाग घेऊन भारताला जबाबदार नागरिक बनवण्यास प्रोत्साहित करेल, असेही ते म्हणाले.