फिनलॅण्डमधील १० वर्षीय मुलाने केलेला कारनामा जगभरातील वृत्तवाहिन्यांवर चर्चेचा विषय बनला आहे. छोट्या जानीने इंन्स्टाग्राम हे छायाचित्रे शेअर करण्याची सुविधा पुरविणारे प्रसिध्द संकेतस्थळ हॅक करून यातील सुरक्षेबाबतच्या त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत.
त्याने संकेतस्थळाच्या सुरक्षा प्रणालीतील कच्चे दुवे पकडून संकेतस्थळ हॅक करून दाखवले. इन्स्टाग्राम ही सेवा आता फेसबुककडे आहे. फेसबुकने तातडीने या त्रुटींमध्ये सुधारणा केली. तसेच जानीच्या या कारनाम्याची दखल घेत फेसबुकने त्याला दहा हजार डॉलर्सचे बक्षिस देऊ केले. इन्स्टाग्राम संकेतस्थळ हॅक करणाऱ्या जानीला फेसबुककडून एक इ-मेलदेखील प्राप्त झाला, ज्यात २०११ पासून आत्तापर्यंत कंपनीने ‘बग बाउंटी’ विजेत्यांना पुरस्कार स्वरुपात ४३ लाख डॉलर्स दिल्याचे म्हटले आहे. इंन्स्टाग्राममधील या त्रुटीमुळे एखादा वापरकर्ता अन्य वापकर्त्याची कमेंट कशाप्रकारे डिलीट करू शकतो हे जानीने सिध्द केले. जडनच्या या कारनाम्यामुळे तो सर्वात कमी वयाचा ‘बग बाउंटी’ पुरस्कार विजेता ठरला आहे. सुरक्षा ही फार महत्वाची असून, ‘सिक्युरिटी रिसर्चर’ होणे हे आपले स्वप्न असल्याचे तो म्हणाला.